Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कराड, वाळव्याचे तिघे दुचाकी चोर हद्दपार

कराड, वाळव्याचे तिघे दुचाकी चोर हद्दपार



कराड : खरा पंचनामा

कराड तालुका तालुक्यात दुचाकी चोरी करणाऱ्या वाळव्याच्या टोळीप्रमुखासह तिघांना सातारा, सांगली जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. साताऱ्याचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी याबाबत आदेश दिले आहेत.

तिघांना सातारा जिल्हा व सांगली जिल्ह्यातील वाळवा, कडेगाव व शिराळा तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहे. कराड परिसरात दुचाकी चोरी करणाऱ्या एका टोळीला तडीपार करण्यात आले आहे. यामध्ये टोळीचा प्रमुख, महादेव बाळासो कोळी (वय 30 वर्षे, रा. किल्लेमच्छिंद्रगड, ता. वाळवा, जि. सांगली), किशोर कृष्णा गुजर (वय- 24 वर्षे, रा. कोडोली, ता. कराड), रोहीत आनंदा देसाई (वय- 23 वर्षे, रा. तांबवे, ता. कराड) यांचा समावेश  आहे.

याबाबतचा प्रस्ताव कराड तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक ए. टी. खोबरे यांनी सादर केला होता. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी तिघांनाही दोन वर्षा करीता पुर्ण सातारा जिल्हा व सांगली जिल्हयातील वाळवा, कडेगाव, शिराळा तालुका हद्दीतुन हद्दपार करण्याचा आदेश दिला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.