जमिनीसाठी बापानं केला मुलीचा खून
जालना : खरा पंचनामा
मनाविरुद्ध लग्न केले म्हणून जालना तालुक्यातील पीर पिंपळगाव येथे अर्धा एकर जमीन मुलीच्या नावावर केली नाही म्हणून मुलीचा काका-वडीलांमध्ये वाद झाला. त्यातून वडिलांनी मुलीचा खून केला. बुधवारी ही घटना घडली. याप्रकरणी मुलीचे वडील, चुलत्याला अटक करण्यात आली आहे.
मृत मुलीच्या वडील व काकांनी मुलीच्या गळ्याला दोर बांधून घराजवळच्या लिंबाच्या झाडावर लटकवले. तसेच दोघांनीच सरण रचून तिचा मृतदेह जाळला.
गावातील मंदिरात मुलीच्या लग्नाची तयारी सुरू होती. त्यावेळी मुलीच्या काकांनी अर्धा एकर जमीन मुलीच्या नावे करण्याची मागणी केली. परंतु जमीन नावावर करण्यास नकार मिळाल्याने काका आणि वडिलांनी स्वतःची बदनामी झाली म्हणून मुलीला मंडपातून ओढत घरी आणले. मुलीच्या गळ्याला दोर बांधून घराजवळच्या लिंबाच्या झाडावर लटकवले. दोघांनीच सरण रचून तिचा मृतदेह जाळला. राख दोन पोत्यात भरून ठेवली.
सूर्यकाला संतोष सरोदे असे मृत मुलीचे नाव आहे. तर संतोष भाऊराव सरोदे आणि नामदेव भाऊराव सरोदे, अशी संशयितांची नावे आहेत.
सूर्यकाला ही संतोष सरोदे यांची तिसरी मुलगी होती. चुलत आत्याच्या मुलांचे आणि सूर्यकाला हिचे प्रेम जुळले. दोघे ही घरातून पळून गेले होते. माञ घरच्यांनी त्यांना लग्न करून देतो, असे सागून पुन्हा घरी बोलावले.
मंगळवार दि.१३ डिसेंबर रोजी दोघाचे लग्न करण्याचे ठरवले. माञ, काकांनी अर्धा एकर जमीन मुलीच्या नावे करण्याची मागणी करण्याच्या रागातून वडील व काकांनी तिला ओढत घरी आणले. आणि गळ्याला दोर बांधून घराजवळच्या लिंबाच्या झाडावर लटकवले. ऑनर किलिंगची ही घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.