Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अनिल देशमुखांना जामीन मंजूर, पण...

अनिल देशमुखांना जामीन मंजूर, पण... 



मुंबई : खरा पंचनामा 

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांचा तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झालाय. मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुखांना जामीन मंजूर केला आहे. भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआयनं नोंदवलेल्या गुन्ह्यात अनिल देशमुखांना जामीन मंजूर झाला आहे. मात्र, जामिनावर 10 दिवसांची स्थगिती असल्यानं तोपर्यंत देशमुखांचा मुक्काम तुरुंगातच राहणार आहे. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर अनिल देशमुखांना जामीन देण्यात आला आहे. 

याबाबत अॅड. अनिकेत निकम म्हणाले, अनिल देशमुखांसाठी वसुली करत होतो, असा जबाब तक्रारदारानं दिला होता. मात्र, त्याचा कुठलाही पुराव नसल्याचे आम्ही कोर्टासमोर सिद्ध केलं. तसंच, बेकायदेशीररित्या अटकेकडेही कोर्टाचे लक्ष वेधून घेतले. 

अॅड. निकम म्हणाले, "मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि या प्रकरणातील माफीचे साक्षीदार या जोडगोळीने तपासयंत्रणांना दिलेला जबाब विसंगत होता, हे आम्ही न्यायालयात सांगितले, त्यानंतर न्यायालयाने देशमुख यांना जामीन मंजूर केला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.