तोपर्यंत सत्तार यांनी राजीनामा द्यावा : पवार
नागपूर : खरा पंचनामा
वाशीम जिल्ह्यातील गायरान जमीन अवैधरित्या वाटप केल्याचा आरोप कृषिमंत्री अब्दुल सत्तारांवर विरोधकांनी केला आहे. यावरून विरोधकांनी सतत आक्रमक भूमिका घेतल्याचे देखील पाहायला मिळाले. दरम्यान आज याच मुद्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत अब्दुल सत्तारांना राजीनामा घ्यावा अशी मागणी अजित पवार यांनी सभागृहात केली.
यावेळी पवार म्हणाले, अब्दुल सत्तार यांनी काही दलालांच्या माध्यमातून शासकीय जमीन वाटपाची कारवाई केली आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणात मोठ्याप्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. याचे सर्व कागदपत्र माझ्याकडे उपलब्ध आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यातील जमीन वाटपाच्या ऑर्डर काढण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे याची सखोल चौकशी केली पाहिजे आणि संबधित चौकशी होईपर्यंत अब्दुल सत्तार यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला लावला पाहिजे.
पवार म्हणाले, तत्कालीन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जुलै 2019 मध्ये वाशीम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील सावरगाव येथील गायरान जमीन खाजगी व्यक्तीला वाटप केल्याची बाब उघड झाली आहे. सातत्याने या घटना घडत आहे. वेगळ्या प्रकारचे आदेश असताना देखील या जमिनीचे वाटप करण्यात आले आहे. तसेच त्यावेळी वाशीम येथील जिल्हाधिकारी यांचा आदेश देखील सत्तार यांनी रद्द केला आहे. तसेच एक महिन्याच्या आत गायरान जमीन नियमित करण्याचे लेखी आदेश सत्तार यांनी दिले होते, असेही पवार म्हणाले.
गायरान जमिनीबाबत होत असलेल्या आरोपाला अब्दुल सत्तार यांनी देखील बुधवारी सभागृहात उत्तर दिले आहेत. वाशीम जिल्ह्यातील गायरान जमीन वाटप नियमानुसारच केले आहे, असे सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.