आता फडणवीसांशी कुस्ती करू का मारामारी?
नागपूर : खरा पंचनामा
नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. आता अधिवेशनाचे दोन दिवसचं शिल्लक राहिले आहेत. यातच विरोधी पक्षनेते अजित पवार यांना विधानसभेतील कामकाजाबाबत प्रश्न विचारले असता आता सभागृहात फडणवीसांशी कुस्ती करू, का मारामारी करू? अशी शाब्दिक फटकेबाजी अजित पवारांनी पत्रकारांशी बोलतांना केली.
सुयोग निवासस्थानी पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी फडणवीसांवर मिश्किल टिप्पणी केली. सभागृहात तुम्ही सत्ताधारी पक्षाला वेठीस धरण्यास कमी पडत आहात का ? तसेच देवेंद्र फडणवीस यांच्याशी सलगी वाढली आहे काय असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर पवार म्हणाले की, आता सभागृहात फडणवीसांशी कुस्ती करू, का मारामारी करू?
शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना आणि विरोधी पक्षात असतानाही त्यांचे सर्वच पक्षातल्या नेत्यांशी सलोख्याचे संबंध होते. म्हणजे काय गुळपीठ असते का? असा प्रतिप्रश्न त्यांनी यावेळी केला.
ते म्हणाले, जिथे विरोध करायचा तिथे तो आम्ही करतच असतो. जे आमदार पाच वर्षासाठी निवडून येतात, त्यांना पेन्शन मिळते, पण तीस वर्ष काम करूनही शिक्षक व कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळत नाही, हा विरोधाभास योग्य नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या आमदारांनी केली असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.