वाहन विभागाचे 'पं(त)च' की कळलावे नारद!
सांगली : खरा पंचनामा
शहरातील वाहन विभागाचे 'पं(त)च' आपल्याच धुंदीत आहेत. आपल्या विभागाचा कार्यभार, कर्तव्य सोडून त्यांना कळलाव्या नारदाची भूमिका फारच आवडत आहे, असे बोलले जात आहे. नुकतेच त्यांचा विभाग सोडून सांगली, मिरजेतील काही जणांना विशेष कर्तव्यावर पाठवण्यात आले आहे. या पं(त)च यांनीच साहेबांचे कान भरल्याने त्यांना विशेष कर्तव्यावर पाठवल्याची चर्चा आहे. शिवाय त्यांच्या विभागातील एकालाही अशा विशेष कर्तव्यावर पाठवण्यात आले नाही. त्यामुळे ते पं(त)च नाहीत तर कळ लावे नारद असल्याचे बोलले जात आहे.
या पं(त)च यांनी एक कर्मचारी म्हणून सेवा सुरू केली. आता ते मोठ्या पदावर पोहोचले आहेत. मिरजेसह सांगलीतील एका मोठ्या प्रकरणाचा खोलवर? तपास केल्याचा आव ते आणतात असे त्यांचेच जुने सहकारी, सध्याचे अधिकारी बोलत आहेत. त्यांनी एका कार्यालयाचे रुपडेच पालटले (शासनाच्या पैशाने) अशीही वृत्ते माध्यमातून आली आहेत.
या पं(त)च यांनी शहरातील एका मोठ्या प्रकरणात अनेकांना क्लीन चिट दिल्याचीही चर्चा आहे. या पं(त)च साहेबांचे बगळे शहरात येणाऱ्या सर्व रस्त्यावर नियंत्रण आणि नियमन करतात. हे बगळे सर्व सामान्य वाहनधारकांना विनाकारण त्रास देतात अशीही चर्चा आहे.
शहरात गरज असताना बगळे शहराबाहेर थांबून काय करतात याचा शोध घ्यावा अशी मागणी नागरिक करत आहेत. त्यामुळे या पं(त)च साहेबांची पोलखोल कोण करणार असा प्रश्न आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.