Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते निलंबित

हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते निलंबित 



पुणे : खरा पंचनामा 

निर्णयात अनियमितता आणि हडपसर येथील जमिनीच्या प्रकरणात दिलेले चुकीचे आदेश यावरून हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांना निलंबीत करण्यात आले आहे. यासंबंधीचे आदेश राज्य शासनाच्या वतीने शुक्रवारी रात्री काढण्यात आले. 

हडपसर येथील जमिनीच्या प्रकरणात कोलते यांच्याकडून चुकीचे आदेश करण्यात आले आहेत. याशिवाय कोविड काळात औषध खरेदीतील अनियमितता आणि निवडणूक विषयक गंभीर स्वरूपाच्या तक्रारी कोलते यांच्याविरोधात होत्या. त्याआधारे कोलते यांना निलंबित करण्यात आल्याचे निलंबनाच्या आदेशात म्हटले आहे. हडपसर येथील जमीन प्रकरणात तत्कालीन महसूल मंत्री तसेच जिल्हाधिकारी आणि वरिष्ठांचे आदेश लक्षात न घेता निर्णय देताना अनियमितता करण्यात आल्याचा प्रमुख आरोप कोलते यांच्यावर ठेवण्यात आला आहे. 

तृप्ती कोलते गेल्या दोन वर्षापासून हवेली तहसीलदार म्हणून काम पाहत आहेत. संपूर्ण पुणे शहर आणि शहरालगतच्या ग्रामीण भागाचा हवेली तालुक्यात समावेश आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.