Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलीस कर्मचाऱ्याची गळफासाने आत्महत्या

पोलीस कर्मचाऱ्याची गळफासाने आत्महत्या



नागपूर : खरा पंचनामा

नागपूर शहर पोलीस दलातील पोलीस शिपायाने पोलिस क्वाटर्सच्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या  केली. पत्नीचे निधन झाल्यामुळे गेल्या वर्षभरापासून असलेल्या संतोष वानखेडे नैराश्यात होते. शनिवारी सकाळी ही घटना घडली. ते बेलतरोडी पोलीस ठाण्यात  कार्यरत होते.

वानखेडे सध्या बेलतरोडी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत होते. त्यांचे आई-वडील यवतमाळ येथे राहतात. त्यांची पत्नी मध्य रेल्वेत कार्यरत होती. मात्र, मागील वर्षी त्यांचे निधन झाले. पत्नीच्या निधना पासून ते नैराश्यात होते. त्यांना 12 वर्षाचा मुलगा असून तो त्यांच्या आई-वडिलांकडे राहतो.

शनिवारी अधिवेशनाची ड्यूटी लावण्यात आली होती.
मात्र, ते बेलतरोडी ठाण्यात ड्यूटीवर हजर न झाल्याने पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या कर्मचाऱ्याकडे संपर्क साधला. कर्मचाऱ्याने संतोष राहत असलेल्या क्वॉटर्सवर गेला.
त्यावेळी त्यांना संतोष यांनी गळफास  घेतल्याचे दिसले. या प्रकरणी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.