सांगली सिव्हिलचे अधीक्षक डॉ. नंदकिशोर गायकवाड यांचे निधन
सांगली : खरा पंचनामा
सांगली सिव्हिल हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. नंदकिशोर गायकवाड यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने मंगळवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या अचानक निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. गरीब रुग्णांना मदत करणारे डॉक्टर हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
डॉ. गायकवाड गेल्या काही वर्षांपासून मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रोफेसर म्हणून काम करत होते. सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रसूती विभागाचे प्रमुख म्हणून ते काम करत होते. तसेच अधीक्षक म्हणूनही ते कार्यरत होते.
सिव्हिलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना मदत करण्यासाठी ते तत्पर असत. हॉस्पिटलच्या प्रशासनावरही त्यांची चांगली पकड होती. मनमिळाऊ, सुस्वभावी डॉक्टर गायकवाड यांच्या अचानक जाण्याने सिव्हिलमधील अधिकारी, कर्मचारी हळहळ व्यक्त करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.