जत तालुक्यातील एक्साईजच्या दोन राजुचा धुमाकूळ
सांगली : खरा पंचनामा
जत तालुक्यात एक्साईजच्या दोन राजूनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. खरा पंचनामाच्या टीमने नुकताच मोठया राजुचा पर्दाफाश केला आहे. दोन्ही राजू झिरो म्हणूनच काम करतात. गोळा करण्याचे काम मोठ्या राजाकडून काढून घेतल्यानंतर ते काम आता छोट्या राजूकडे देण्यात आले आहे.
हा छोटा राजू काही वर्षांपासून जतमध्ये झिरो म्हणून काम करत आहे. त्याच्या नातेवाईकाच्या मालकीचा बार असल्याचीही चर्चा आहे. तर घरातील एका व्यक्तीच्या नावावर ताडी विक्रीचा परवाना असल्याचे बोलले जात आहे. आता मोठ्या राजूला बाजूला केल्यानंतर छोट्या राजुने तालुक्यात चांगलाच जम बसवला आहे. झिरो म्हणून काम करत असताना त्याने कार्यालयातही वट निर्माण केला आहे.
गोळा करताना त्रास देणाऱ्या किंवा तारीख चुकवणार्यांना हा छोटा राजू जेरीस आणत आहे. हे दोन्ही राजू खात्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांपेक्षा अधिक कारवाया करत असल्याची चर्चा आहे. शिवाय तालुक्यातील मोठ्या कारवायांमध्ये यांचा मोठा सहभाग असतो. हे दोन्ही राजू अधिकृत कर्मचारी नसतानाही खात्यातील लोकांकडून कारवाईची माहिती देताना या दोघांच्या छायाचित्रांसह देत असतात. अशी छायाचित्रे माध्यमातून प्रसिद्ध झाली आहेत. यावरूनच या दोन राजूचा दबदबा दिसून येतो. वरिष्ठ मात्र यावर मूग गिळून गप्प आहेत.
दरम्यान छोट्या राजुनेच लोकांना मोठया राजू विरोधात तक्रारी करायला लावून तालुक्यातील कारभार हातात घेतल्याचीही चर्चा एक्साईजच्या वर्तुळात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.