सांगलीत सशस्त्र दरोडा; चार लाखांचे दागिने लंपास
सांगली : खरा पंचनामा
सांगली शहरातील कर्नाळ रस्त्यावरील दत्तनगर येथे शुक्रवारी पहाटे सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. यावेळी पाच ते सहा दरोडेखोरांनी हत्यारांचा धाक दाखवून सुमारे चार लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास करण्यात आले.
आशिष चिंचवाडे यांनी याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अज्ञात पाच ते सहा जनाविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिंचवाडे दत्तनगर येथे कुटुंबासोबत राहतात. शुक्रवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाच ते सहा जणांनी घराच्या मागील बाजूच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील झोपलेल्या लोकांना उठवून घातक हत्यारांचा धाक दाखवला.
कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली. नंतर त्यांचे हातपाय बांधले. मग घरातील चार लाखाचे सोन्या चांदीचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले.
दरोड्याची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक अजित टिके, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सतीश शिंदे, शहरचे निरीक्षक अभिजित देशमुख यांनी फोजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली.
यावरून सांगली पोलीस सांगली शहर पोलीस ठाणे येथे दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.