अॅट्रॉसिटीची धमकी देवून खंडणीची मागणी : तिघांवर गुन्हा
सांगली : खरा पंचनामा
व्यवहारातील पैशाची मागणी केल्यानंतर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देवून सहा लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
याप्रकरणी मारुती दबडे (वय ६३ रा. कुंठेमळा धामणी रोड) यांनी फिर्याद दिली. अरुण कांबळे ( रा. भोसे, ता. मिरज), सुरेश आदाटे आणि शैलेश आदाटे ( दोघे रा. महात्मा गांधी कॉलनी, जुना कुपवाड रोड सांगली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
दबडे यांच्या मालकीचे दुकान आहे. या दुकानाच्या माध्यमातून संशयित यांच्याबरोबर व्यवसायानिमित्त विविध व्यवहार होत होता. २०१६-१७ ते २०१९ या कालावधित दबडे यानी संशयितांना वेळोवेळी ५४ लाख ३५ हजार रूपये धनादेशद्वारे दिले आहेत. त्यापैकी १५ लाख ५५ हजार रुपये २०१९-२० मध्ये दबडे यांना परत केली.
१ एप्रिल २०२० नंतर सदगुरु श्री अनिरुद्ध (बापू ) वाहतुक संस्थेकडे उर्वरित रक्कम ३८ लाख ८० हजार रूपयांची मागणी दबडे यांनी केली असता संशयीतांनी २९ सप्टेंबर रोजी आम्ही तुम्हाला काहीही देणे लागत नाही, उलट तुम्हीच आमचे सहा लाख रूपये देणे आहे. ही रक्कम दिली नाही तर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करतो, अशी धमकी दिली. त्याबरोबरच सहा लाख रूपये देवून काही तक्रार नाही असे लिहून नाही दिले तर काही खरे नाही, असे म्हणत संशयीतांनी दबडे यांच्या गाडीची चावी काढून घेतली.
त्यानंतर दबडे यांनी तिघांविरोधात विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.