ढाण्या वाघाचा तुम्हाला तळतळाट लागेल!
नागपूर : खरा पंचनामा
नागपूर हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या स्टाईलनं फडणवीसांना चिमटेही काढले आणि जोरदार टोलेबाजीही केली. चंद्रकांत पाटील या कोल्हापूरच्या ढाण्या वाघाकडे, फक्त एक दोन खाती आणि फडणवीस यांच्याकडे 6-6 खाती आहेत. त्यामुळं या गोष्टीचा तुम्हाला तळतळाट लागेल असा टोला पवार यांनी फडणवीस यांचे नाव न घेता लगावला.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत, तुफान बॅटिंग केली आहे. त्यांच्या टार्गेटवर उपमुख्यमंत्री फडणवीसच होते मग महाविकास आघाडीच्या काळातील कामांना दिलेली स्थगिती असो की, अद्याप नसलेल्या महिला मंत्री हा विषय असो या आणि अशा वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांना टोले आणि चिमटे लगावले असले तरी, अजित पवार यांनी ताकदवान नेते म्हणत फडणवीसांचं कौतुकही केलं आहे. भाजपमध्ये सर्वात ताकदवान नेते देवेंद्र फडणवीस असल्याचा उल्लेख करत त्यांनी त्यांचा गौरवही केला आहे.
विधानसभेचं काम सुरु होताच पवार आणि फडणवीस यांच्यामध्ये जुगलबंदी रंगली होती. प्रश्नोत्तराच्या काळात मुख्यमंत्री शिंदे हजर नसल्यानं अजितदादांनी नाराजी व्यक्त केली. यावेळ मुख्यमंत्री प्रश्नोत्तारावेळी हजर का नाही ? असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.
काही महिन्यांआधी बावनकुळे यांनी बारामतीतलं राष्ट्रवादीतलं घड्याळ बंद करण्याचा इशारा दिला होता पण मनात आणलं तर तुमचाच करेक्ट कार्यक्रम करणार, असा इशाराही अजितदादांनी यावेळी बावनकुळे यांना दिला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.