सीमाभाग केंद्रशासित करा : उद्धव ठाकरे
नागपूर : खरा पंचनामा
कर्नाटक हे भारताचं राज्य आहे की नाही? सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आम्हाला बंधनकारक आहे मग कर्नाटकाला नाही का? सीमावादावर कर्नाटकातील सर्व पक्ष एकत्रित येतात. ते चित्र आपल्याकडे दिसत नाही. आजच सीमावाद कसा पेटला? सीमाभाग केंद्रशासित झाला पाहिजे. कानडींचा अत्याचार थांबलाच पाहिजे. संपूर्ण प्रशासन केंद्र सरकारने हाती घेऊन पालकत्व करावं असा ठराव आजच्या आज झाला पाहिजे अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत केली.
ठाकरे म्हणाले, सीमाप्रश्न हा भाषावार प्रांत रचनेचा विषय नाही. खालच्या सभागृहात काहीजण म्हणतात आम्ही लाठ्या काठ्या खाल्ल्या आहेत. त्यावेळी तुम्ही सत्ताधारी पक्षात होता आता तुम्ही सीमा ओलांडली आहे. मुख्यमंत्री दिल्लीत गेले. खरतर हा विषय सुरु असताना दिल्लीला जाणे योग्य आहे का? मुळात गृहमंत्र्यांसोबत बैठक झाल्यानंतर यांनी केलं काय? येथे आम्ही कायदा केला की महाराष्ट्रात मराठी पाट्या लागल्या पाहिजेत तर काही जण कोर्टात गेले. मुळात आपलं सरकार कर्नाटक सरकार सारखी भुमिका मांडणार आहे का? असा प्रश्नही ठाकरे यांनी उपस्थित केला.
बेळगाव महापालिकेने महाराष्ट्रात जाण्यासाठी ठराव पास केला त्यानंतर ती महापालिका कर्नाटकने बरखास्त केली. येथे ग्रामपंचायत तरी बरखास्त करणार आहात का? जर ठराव मांडणार असाल तर सीमा भाग केंद्राने ताब्यात घ्यावा.
असाच ठराव असला पाहिजे आजच ठराव करा आणि केंद्राकडे पाठवा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.