निलंबनानंतर जयंत पाटील यांच सुचक ट्विट!
नागपूर : खरा पंचनामा
हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधानसभेत मोठा गोंधळ बघायला मिळाला. आतापर्यंत ६ वेळा सभागृह तहकुब करण्याचा निर्णय घेतला आहे. दिशा सालियन प्रकरणावरून शिवसेनेचे नेते भास्करराव जाधव यांना बोलू द्यावे, अशी विनंती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी केली. पण जाधव यांना बोलू न दिल्याने पाटील यांनी अध्यक्षांना उद्देशून असंसदीय शब्द वापरले. त्यावरून त्यांचे निलंबन करण्यात आले. त्या कारवाईवर आता जयंत पाटील यांनी सूचक ट्विट केले आहे.
निलंबनाची कारवाई केल्यानंतर जयंत पाटलांनी एक सुचक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, या निर्लज्ज सरकार विरोधात लढत राहणार,,,,, बहहे प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की जय असा टॅग केला आहे.
जयंत पाटलांचं निलंबन केल्यानंतर विधान सभेच्या परिसरात आघाडीतील नेत्यांनी आंदोलन केलं. तसेच आघाडीच्या सर्व आमदारांनी जयंत पाटलांना खांद्यावर उचलून घेत आम्ही तुमच्या पाठीशी असल्याचं त्यांनी संदेश दिला. यावेळी आघाडीच्या नेत्यांनी राज्य सरकारवर जोरदार घोषणाबाजी करत हल्लाबोल केला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.