रोहित पाटलांनी सत्ता आणताच जेसीबीतून उधळला गुलाल
सांगली : खरा पंचनामा
सांगली जिल्ह्यात जिल्ह्यातील 416 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांची मतमोजणी मंगळवारी झाली. यामध्ये जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठे यश मिळाले आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटनाद्रे येथे कार्यकर्त्यांनी जेसीबीच्या साहाय्याने गुलालाची उधळण करण्यात आली. रोहित आर आर पाटील यांच्या नेतृत्वाखाली घाटनाद्रेमध्ये राष्ट्रवादीची सत्ता आल्यावर जल्लोष करण्यात आला.
शिंदे गटाला 14, भाजप १२, काँग्रेस 6 तर इतर 6 ठिकाणी सरपंचपदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतमोजणी झाली.
मिरज तालुक्यातील 36, तासगाव तालुक्यातील 26, कवठेमहांकाळ तालुक्यातील 28, जतमधील 81, खानापूरमधील 45, आटपाडीतील 25, पलूसमधील 15, कडेगावमधील 43, वाळव्यातील 88 व शिराळ्यातील 60 ग्रामपंचायतींचे कारभारी निवडण्यासाठी निवडणूक झाली.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सरपंचपदाच्या 416 जागांसाठी तब्बल 1665 उमेदवारांचे 1442उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. जिल्ह्यातील 38 गावच्या कारभार्यांची बिनविरोध निवड झाली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.