मतमोजणीपूर्वीच महिला उमेदवाराच्या पतीचा मृत्यू
उस्मानाबाद : खरा पंचनामा
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आज जाहीर होत आहे. सकाळपासून मतमोजणी सुरू झाली असून आतापर्यंत अनेक ठिकाणचे निकाल हाती आले आहेत. मात्र उस्मानाबाद जिल्ह्यात एक दुर्देवी घटना घडली आहे. उस्मानाबादेत मतमोजणीपूर्वीच महिला उमेदवाराच्या पतीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील तेर गावात ही दुर्देवी घटना घडली आहे. येथील प्रभाग १ मधून लढत असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुनीता गोरे यांचे पती रामहरी गोरे यांचा आज सकाळीच हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला.
उस्मानाबाद तालुक्यातील तेर ही सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. भाजप आमदार राणा पाटील यांचं हे मूळ गाव आहे. येथे भाजप, महाविकास आघाडी आणि आम आदमी पार्टी अशी तिहेरी लढत होत आहे.
मृत रामहरी गोरे यांच्या पत्नी सुनीता गोरे या देखील निवडणुकीसाठी मैदानात उतरल्या होत्या. यावेळी गोरे यांनी आपल्या पत्नीचा जोरदार प्रचार केला. मात्र, निवडणुकीचा निकाल येण्याआधीच आज सकाळी त्यांना ह्रदयविकाराचा जोरदार झटका आला. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र वाटेतच गोरे यांचा मृत्यू झाला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.