ठाणे मनपा अतिरिक्त आयुक्तांसह पाच जणांना अटक वॉरंट
ठाणे : खरा पंचनामा
ठाणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्यासह पाच जणांना ठाणे सत्र न्यायालयाकडून अटक वॉरंट बजावण्यात आले आहे. 2015 साली बेकायदा गाळ्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाईदरम्यान माळवी यांनी सुभाष ठोंबरे यांना मारहाण केल्याची तक्रार फिर्यादीने केली होती. या प्रकरणी 2018 साली गुन्हा नोंद झाल्यानंतर, तसेच त्यावर आरोपपत्र दाखल झाल्यानंतर कोर्टाने समन्स पाठवून हजर न झाल्याने हा अटक वॉरंट बजावल्याचे समजते.
2015 मध्ये ठाणे महानगरपालिकेतील वर्धापनदिनी देण्यात आलेले पुरस्कार चुकीच्या व्यक्तींना दिला असल्याचा आरोप सुभाष ठोंबरे यांनी केला होता. याच प्रकरणाची माहिती घेत असताना संदीप माळवी यांनी गैरवर्तणूक केल्याप्रकरणी 2018 साली गुन्हा नोंद करण्यात आला. तर संदीप माळवी यांनी देखील 2015 साली सुभाष ठोंबरे यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला होता. संदीप माळवी यांच्यासोबत तत्कालीन अतिरिक्त आयुक्त अविनाश रणखांब आणि इतर 5 जणांचे देखील अटक वॉरंट जारी करण्यात आले.
तक्रारदार संदीप माळवी आणि तक्रारदार सुभाष ठोंबरे यांनी एकमेकांविरोधात गुन्हा नोंद केल्याने कोर्ट या प्रकरणावर निर्णय देणार आहे.
काही वर्षांपूर्वी बेकायदा गाळ्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाईदरम्यान माळवी यांनी सुभाष ठोंबरे यांना मारहाण केल्याची तक्रार फिर्यादीने केली होती. ठाणे न्यायालयात याप्रकरणी सुनावणी सुरू असून न्यायमूर्तींनी संदीप माळवी, तत्कालीन अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब यांच्यासह अन्य पाच जणांवर अटक वॉरंट जारी करण्याचे आदेश नौपाडा पोलिसांना दिले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.