Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्यात जयंतरावांची राजकीय ताकद वाढली!

राज्यात जयंतरावांची राजकीय ताकद वाढली! 



सांगली : खरा पंचनामा 

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात असंसदीय शब्द वापरल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांचे अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आले. त्याचा निषेध म्हणून विरोधकांनी चांगलेच रान पेटवले आहे. कधी नव्हे ते विधानभवनाबाहेर आमदारांनी जयंतरावाना उचलून घेत त्यांना समर्थन दिले. याच दरम्यान विधानसभेत खमक्या विरोधी पक्षनेता हवा अशी मागणी जोर धरू लागली आहे. 

जयंतरावांच्या समर्थनात राज्यात झालेली आंदोलने त्यांची राज्यातील राजकीय ताकद वाढल्याचे तज्ञ बोलत आहेत. हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचा ठाकरे गट आक्रमक झाला आहे. सीमावाद यासह मुख्यमंत्री शिंदे यांचा जमीन घोटाळा यावरून विरोधकांनी रान उठवले आहे. त्याचा प्रतिकार करण्यात सरकार अयशस्वी ठरत असल्याने दिशा सलीयन खून प्रकरणात आदित्य ठाकरे यांना गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी एसआयटी नेमण्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री फडणवीस यांनी केली आहे. त्यावरून विरोधक आणखी आक्रमक झाले आहेत. 

सभागृहात विरोधी पक्षातील आमदारांना बोलू दिले जात नसल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला धारेवर धरले होते. त्यावेळी विरोधी पक्ष्याचा आवाज दाबण्याचे काम विधानसभा अध्यक्ष करत असल्याचा आरोप केला जात होता. त्यावेळी सुरु असलेल्या गदरोळात जयंत पाटील बोलत असताना त्यांच्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढला असा आरोप विरोधी पक्षातील आमदार करत होते. तरीही जयंत पाटील यांचे अधिवेशन काळापुरते निलंबन करण्यात आले. त्याचे पडसाद विधानभवनाबाहेर उमटलेच शिवाय राज्यात अनेक ठिकाणी या कारवाईच्या विरोधात तीव्र आंदोलने करण्यात आली. 

पाटील यांच्या निलंबनानंतर विरोधी आमदारांनी जयंत पाटील यांना खांद्यावर उचलून घेत जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. पाटील यांच्या समर्थनार्थ आंदोलने झाली. निलंबनानंतर जयंतराव शनिवारी त्यांच्या मतदारसंघात आले त्यावेळी त्यांचे जँगी स्वागत करण्यात आले. पाटील यांच्या निलंबनानंतर राज्याला खमक्या विरोधी पक्षनेत्याची गरज आहे असा सूर सोशल मिडिया आणि राजकीय कारकर्त्यांकडून उमटला जात आहे. 

अजित पवार सरकारला म्हणावे तितक्या जोरदारपणे धारेवर धरत नसल्याचे विरोधी सर्वच पक्षातील आमदार खासगीत बोलत आहेत. त्यामुळे सध्या तरी जयंतराव पाटील यांचे राज्यातील राजकीय वजन चांगलेच वाढल्याचे बोलले जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.