सोलापुर जवळ पुणे केंद्रीय सीमा शुल्क विभागाकडून 56 किलो गांजा जप्त
खरा पंचनामा | सांगली
2 आणि 3 डिसेंबर 2022 च्या मध्यरात्री हैदराबादमधून मोठ्या प्रमाणात गांजा वाहतूक पुणे सीमा शुल्क च्या हद्दीतून होत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे, अधिकाऱ्यांचे एक पथक 2 डिसेंबर 2022 रोजी संध्याकाळी पुण्याहून सोलापूरकडे रवाना झाले.
राज्य परिवहन बसचा पाठलाग करून ती सोलापूरजवळ अडवण्यात आली असता बसमध्ये तपासणअंती 56 किलो गांजा मिळून आल्याने तो एनडीपीएस कायद्यांतर्गत जप्त करण्यात आला आणि 3 जणांना अटक करण्यात आली.
पुढील तपास पुणे केंद्रीय सीमा शुल्क कडून सुरू आहे. पुणे सीमा शुल्क विभागाच्या अधिकृत ट्विटर हँडल वरून ही माहिती देण्यात आली
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.