थर्टी फर्स्टच्या पार्टीत 1 कोटींचे ड्रग्ज जप्त
नवी मुंबई : खरा पंचनामा
नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने खारघर मधील एका रो हाऊसवर छापा टाकून सुमारे एक कोटींचे अमली पदार्थ (ड्रग्ज) जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांमध्ये चरस, गांजा, एमडी यासारख्या पदार्थांचा समावेश आहे.
या प्रकरणात तब्बल 16 नायजेरीयन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये महिलांचाही समावेश आहे. थर्टी फर्स्टच्या पूर्वसंध्येला पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली.
खारघर मधील एका रो हाऊसमध्ये अमली पदार्थ असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी संबंधित रो हाऊसवर छापा टाकला. या छाप्यात जवळपास एक कोटींपेक्षा अधिक रकमेचे अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले आहेत.
यामध्ये चरस, गांजा, एमडी यासारख्या अमली पदार्थांचा समावेश आहे. या प्रकरणात पोलिसांनी 16 नायजेरीयन व्यक्तींना अटक केली आहे. यामध्ये 10 पुरुष आणि 6 महिलांचा समावेश आहे. पोलिसांनी या सर्वांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांची रवानगी तळोजा कारागृहात केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.