गोविंद पानसरे हत्येप्रकरणी 10 जणांवर दोष निश्चिती
कोल्हापूर : खरा पंचनामा
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट आणि हत्या केल्या प्रकरणी कोल्हापूर जिल्हा न्यायालयाने सोमवारी 10 संशयितांवर दोष निश्चिती केली. यामध्ये समीर गायकवाड, वीरेंद्रसिंह तावडे यांच्यासह इतर संशयितांचा समावेश आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी 23 जानेवारीला होणार आहे.
गोविंद पानसरे यांची हत्या झाल्यानंतर एसआयटीने तपास करुन 12 संशयितांवर गुन्हा दाखल केला होता. एसआयटीच्या तपासानंतर हा गुन्हा एटीएसकडे वर्ग करण्यात आला. एटीएसकडून याचा तपास सुरु आहे. दरम्यान, गुन्ह्यातील दहा संशयितांवर सोमवारी कोल्हापूर जिल्हा न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश तिसरे एस.एस. तांबे यांच्यासमोर दोष निश्चित करण्यात आली.
न्या. तांबे यांनी सर्व संशयितांना आरोपाबद्दल विचारणा केली. सर्व संशयितांनी आरोप नाकारले.
त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर दोष निश्चिती करण्यास न्यायालयाने परवानगी दिली.
या प्रकरणावर पुढील सुनावणी 23 जानेवारीला होणार आहे. पुढील सुनावणीमध्ये गुन्ह्यासंबंधी आवश्यक कागदपत्रे, पुरावे आणि साक्षीदार यांची यादी सादर केली जाणार आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी दिली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.