1500 आणि 200 म्हणजे काय ओ पंतभाऊ?
मुंबई : खरा पंचनामा
टार्गेटच्या नादात रायडरचा बळी गेल्यानंतर खूपच चर्चा सुरू आहे. त्यानंतर आता 1500 आणि 200 म्हणजे काय ओ पंतभाऊ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पंत भाऊंनी नेमके कोणते टार्गेट दिले होते याची आता दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
खरा पंचनामाच्या टीमने पंतभाऊचे कारनामे उघड केल्यानंतर अनेकांनी टीमचे अभिनंदन केले आहे. एक नंबर साहेबांच्या जवळ असल्याने आणि त्यांचा खास सल्लागार असल्याची बतावणी करणारे हे पंतभाऊ सध्या तरी जोमात आहेत. कोणीही काहीही बातमी देऊ दे माझी काहीच वा.. डी होत नाहीत अशी प्रतिक्रिया ते देत असल्याचे समजते.
दरम्यान सगळे धंदे बंद असले तरी पंतभाऊंची गाडी मात्र सुसाट वेगाने धावत आहे. रोजचे 30k घरी नेल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही असा त्यांनी चंगच बांधल्याची चर्चा सुरू आहे. आता एक नंबर साहेबांचा खास असल्याची स्वतःच बतावणी करणारा हा पंतभाऊ एका मोठया खून प्रकरणात भविष्यात अडचणीत येईल असेही बोलले जात आहे.
काहीही असो पंतभाऊंनी 1500 आणि 200 चे गणित समजावून सांगावे असे त्यांचेच अन्य विभागातील सहकारी म्हणत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.