'ते' 18 जण परत आले पण...
सांगली : खरा पंचनामा
जिल्ह्यातील विशेष कर्तव्यावर पाठवलेले ते 18 जण पुन्हा त्यांच्या जागी परत आले आहेत. पण त्यांना परत आणताना मोठ्या 1 नंबर साहेबांनी चांगल्याच अटी घातल्याची चर्चा आहे. काहीही असले तरी मूळ कर्तव्यावर हजर झाल्याचा त्यांचा आनंद काही औरच आहे. पण विनाकारण झालेल्या कारवाईचे शल्यही मनात आहे.
जिल्ह्यात नवीन आलेल्या 1 नंबर साहेबांनी वाहन विभागाच्या पंतांचे ऐकून या 18 जणांना विशेष कर्तव्यावर पाठवले होते अशी चर्चा आहे. यात काही जणांचा कोणताही संबंध नसताना त्यांना त्या विशेष कर्तव्यावर जावे लागले. कोणतीही चूक नसताना झालेल्या शिक्षेमुळे यातील काहींनी उघड नाराजी व्यक्त केली.
फक्त दिवाळी आणि काही कामे केली नाहीत म्हणून आताच्या आणि त्यावेळच्या पंतांनी सूड घेतल्याची भावना त्यांच्याकडून व्यक्त होत आहे. दरम्यान त्यांना परत मूळ कर्तव्यावर आणताना 1 नंबर साहेबांनी काही अटी ठेवल्याची चर्चा आहे. त्या अटी कोणत्या आहेत याबाबतचे गूढ वाढले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.