महाराष्ट्रातील 189 कैद्यांना मिळणार विशेष माफी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था/खरा पंचनामा
सध्या देशभरात ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा केला जात आहे. याचा एक भाग म्हणून विशिष्ट प्रवर्गाच्या बंद्यांना विशेष माफी देण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला आहे. चांगली वर्तवणूक व इतर निकषांनुसार यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्रातील 189 बंद्यांना विशेष माफी देऊन त्यांची कारागृहातून मुक्तता केली जाणार आहे. अशी माहिती कारागृह प्रशासनाने दिली आहे.
15 ऑगस्ट 2022, 26 जानेवारी 2023 आणि 15 ऑगस्ट 2023 या काळातील बंद्याना विशेष माफी देऊन मुक्त केले जाणार आहे. कैद्यांना गुन्हेगारी जीवन सोडून देशाचे जबाबदार नागरिक बनावे यासाठी उपक्रमाची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
यासाठी संबंधित बंद्याचे कारागृहातील वर्तन चांगले असणे गरजेचे आहे. ज्या महिला, पुरुष आणि तृतीयपंथी बंद्याचे वय 50 वर्षापेक्षा जास्त आहे, ज्यांनी 50 टक्के शिक्षेचा कालावधी पूर्ण केला आहे. 70 टक्क्यांपेक्षा अधिक शारीरिक दृष्ट्या दिव्यांग बंद्यानी निम्मी शिक्षा भोगलेली आहे. गंभीर आजाराने ग्रस्त असलेले बंदी, ज्या बंद्याचा शिक्षेचा कालावधी संपलेला आहे. मात्र ज्यांना न्यायालयाने दिलेल्या दंडाची रक्कम भरता आली नाही, अशाना विशेष माफी दिली जाणार आहे.
तसेच ज्या बंद्याने 18 चे 21 वर्षाच्या वयोगटात अपराध केला परंतु त्यानंतर कोणता अपराध न करता 50 टक्के शिक्षा भोगलेली आहे, अशांचा विशेष माफीत समावेश करण्यात आला आहे.
गंभीर गुन्ह्यात शिक्षा झालेल्याना या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. विशेष माफी अंतर्गत सुटका करण्यात येणाऱ्या कैद्यांना समाजात पुर्नवसन करण्यासाठी मार्गदर्शन सत्राचे देखील आयोजन केले जाणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.