Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

फडणवीसांना 2024 मध्ये आम्हीच सरप्राईज देऊ!

फडणवीसांना 2024 मध्ये आम्हीच सरप्राईज देऊ!



मुंबई : खरा पंचनामा 

राज्यातील राजकीय घडामोडींमागे देवेंद्र फडणवीस यांचाच हात होता, असा आरोप विरोधकांकडून वारंवार केला जात आहे. दरम्यान, सर्व सरप्राईज आता संपले असून 2024 मध्ये अनेक सरप्राईज देऊ असे फडणवीस यांनी एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. त्याला उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मिश्किल टिपणी केली. पाटील म्हणाले फडणवीस यांना आम्हीच 2024 मध्ये सरप्राईज देऊ.

फडणवीस यांनी केलेल्या विधानानंतर आगामी काळात राज्यात कोणती राजकीय उलथापालथ होणार, असा प्रश्न विचारला जात आहे. यावर राष्ट्रवादीचे  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उत्तर दिलं आहे. आम्हीच फडणवीस यांना 2024 मध्ये अनेक सरप्राईज देऊ असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

2024 साली लोकसभेसोबतच  विधानसभेचीही निवडणूक  होईल, असे मी गृहीत धरलेले आहे. हे गृहीत धरुनच आम्ही कामाला लागलो आहोत. सध्या अनेक घटक एकत्र येऊन चर्चा करत आहेत. त्यातून आगामी काळातील चित्र निराशाजनक असेल. 2024 साली सकारात्मक विचार करुन महाविकास आघाडीला सत्तेत आणण्याचे काम केले जाईल. लोक फार हुशार असतात. आपण मतदान केलेल्या नेत्याने पक्षबदल केल्यावर त्या नेत्यालाच लोक मनातून काढून टाकतात. त्यामुळे 2024 साली आमचे सरकार पुन्हा सत्तेत येईल आणि हेच देवेंद्र फडणवीस यांना सरप्राईज असेल, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

जे ठाम असतात तेच आपले असतात
जे जाणारे असतात ते कधीच कोणाचे नसतात. त्यामुळे त्यांच्या मागे लागायचे नसते. लोक येत असतात जात असतात. कोण कच्चं कोण पक्कं आहे याबाबत आपल्याला माहिती असते. जोपर्यंत आपल्यात नवी माणसं निवडून आणण्याची ताकद असते तोपर्यंत घाबरण्याची गरज नसते. निवडणूक जवळ आल्याने काही लोक येतील काही लोक जातील, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.