मुंबईतील सराफांना 'स्पेशल 26'चा दणका!
मुंबई : खरा पंचनामा
मुंबईमधील झवेरी बाजारात 'स्पेशल 26' च्या भामट्यांनी सराफाला सोने, रोकड असा कोट्यवधी रुपयांचा चुना लावून दणका दिला आहे. ईडीचे खोटे अधिकारी बनून चौघांनी ही लूट केल्याची चर्चा आहे. बनावट ईडी अधिकाऱ्यांनी मुंबईच्या झवेरी बाजार परिसरात छापे टाकून करोडोची लूट केली आहे.
चार तोतया अधिकाऱ्यांनी एका व्यावसायिकाच्या कार्यालयावर छापा टाकला आणि स्वतःला ईडीचे अधिकारी असल्याचे सांगितले. स्वतःला अधिकारी म्हणवणाऱ्यानी तक्रारदार व्यावसायिकाच्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला बेड्याही घातल्याचे सूत्रांनी सांगितले.
यानंतर त्या तोतयानी त्या व्यावसायिकाच्या कार्यालयातून २५ लाख रुपये रोख आणि ३ किलो सोने चोरून नेले. सोन्याची एकूण किंमत एक कोटी 70 लाख असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी 4 अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या दुकानात आणि परिसरात असलेल्या सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिस तोतया लोकांचा शोध घेत आहेत.
या स्पेशल 26 स्टाईलने झालेल्या चोरीच्या घटनेची आता संपूर्ण मुंबईभर चर्चा सुरू आहे. फिल्मी स्टाईलने चोरट्यांनी तब्बल 25 लाखांची रोकड लंपास केल्याने पोलीस देखील हादरले आहेत. या प्रकरणात दोन संशियत व्यक्तींना ताब्यात घेण्यात आलं आहे. दोघांचा गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट झाल्यास दोघांवर अटकेची कारवाई केली जाईल असे सांगण्यात येत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.