Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

येरवडा कारागृहात 3 कैद्यांचा मृत्यू

येरवडा कारागृहात 3 कैद्यांचा मृत्यू 



पुणे : खरा पंचनामा  

येथील येरवडा कारागृहामध्ये तीन कैद्यांचा मृत्यु झाला आहे. या तीन कैद्यांचा मृत्यू वेगवेगळ्या आजरामुळे झाला आहे. याबाबत येरवडा पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. महत्त्वाचे म्हणजे ज्यावेळी एका कैद्याचे कुटुंबीय त्याला भेटण्यासाठी कारागृहात गेले त्यावेळी त्यांना मुलाचा मृत्यु झाल्याचे सांगण्यात आले.   

शाहरुख शेख, संदेश गोंडेकर, रंगनाथ दाताळ अशी मृत कैद्यांची नावे आहेत. संदेश गोंडेकर याच्यावर 2018 मध्ये खुनाचा गुन्हा दाखल झाला असून तेव्हापासून तो येरवडा कारागृहात आहे. त्याचे आई-वडील त्याला भेटण्यासाठी नियमीतपणे जात होते. 31 डिसेंबरला त्याचे वडील त्याला भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना मुलाचा मृत्यु झाल्याची माहिती देण्यात आली.   

यानंतर संदेश याच्या वडिलांनी मुलाच्या मृत्यूप्रकरणी कारागृह प्रशासन जबाबदार असल्याचे सांगत आक्षेप नोंदवला. यानंतर येरवडा कारागृहातील अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याचा मृत्यु ‘लिव्हर सोरायसिस’ या आजाराने झाल्याचे स्पष्ट केले. याशिवाय शाहरुख शेख व रंगनाथ दाताळ हे दोन्ही कैदी वेगवेगळ्या आजारांनी ग्रासले होते. यातुनच त्या दोघांचा मृत्यू झाला. 

यासंदर्भात येरवडा कारागृह प्रशासनाने संबंधित मृत कैद्यांच्या कुटुंबीयांना पोलीस ठाण्यामार्फत कळवले आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.