Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नेपाळमध्ये विमान कोसळलं, 32 जणांचा मृत्यू!

नेपाळमध्ये विमान कोसळलं, 32 जणांचा मृत्यू! 



काठमांडू : वृत्तसंस्था/खरा पंचनामा 

नेपाळमध्ये यती एअरलाइन्सचे विमान पोखराजवळ कोसळले आहे. काठमांडूहून पोखराला उड्डाण करणारे यती एअरलाइन्सचं विमान रविवारी सकाळी कास्की जिल्ह्यातील पोखरा येथे कोसळलं. विमानात एकूण 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते. विमान अपघातात आतापर्यंत 32 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. 

दुर्घटनेनंतर बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. या घटनेचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बचावकार्य करतानाचे फोटो समोर आले आहेत. विमानाचा अपघात झाल्यानंतर लगेच आगीचे लोट आणि धूराचे लोट असल्यामुळे बचावकार्यात अडचणी येत आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विमानात दहा विदेशी नागरिक प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये पाच भारतीय प्रवासी होते, अशीही माहिती मिळत आहे. 

खराब हवामान असतानाही विमानाने उड्डाण केल्याचे समोर आले आहे. एका वृत्तवाहिनीने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, पायलट कॅप्टन कमल केसी हे विमान उडवत होते. पोखरा येथील सेती खोच येते हे विमान कोसळले असून त्यानंतर विमानाला आग लागली. 

यती एअरलाईन्सचे प्रवक्ते सुदर्शन बर्तौला यांनी सांगितले की, आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत बचावकार्य़ वेगात सुरु आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.