अल्पवयीन मुलीचा विनयभंग; तरुणाला 4 वर्षाचा कारावास
सांगली : खरा पंचनामा
अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी एका तरुणाला 4 वर्षे कारावास, 15 हजार रुपये दंड, दंड न दिल्यास 8 महिन्याचा सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा व जादा सह सत्र न्यायाधीश ए. एस. महात्मे यांनी शुक्रवारी हा निकाल दिला.
दिनेश मंजु उर्फ मंजुनाथ चौगुले (वय २०, रा. इंदिरानगर, सांगली) असे शिक्षा झालेल्या तरुणाचे नाव आहे. दंडाची संपुर्ण रक्कम पीडित मुलीला नुकसान भरपाई म्हणून देण्याबाबतचा आदेश न्यायालयाने दिला. या खटल्यात सरकापक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील अनिलकुमार कुलकर्णी यांनी काम पाहिले.
दिनेश चौगुले याने पिडीत मुलगी ही अल्पवयीन आहे हे माहिती असताना देखील दि. २३ जून २०२० रोजी पिडीता सकाळी बाथरुमला गेली असता तिच्याकडे सारखा एकटक बघून तिचे मनास लज्जा उत्पन्न होईल अशा पद्धतीने तिला इशारे केले. तसेच "तू मला खूप आवडतेस, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे असे म्हणाला." त्यानंतर दि. २५ जून २०२० रोजी रात्री ११ च्या सुमारास पिडीत मुलगी घरात झोपली असता तो तिच्या घरात घुसला. तिला उठवून, तिच्याशी अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला. त्यावेळी, पिडीत बालिकेची मावशी जागी होऊन तिने "तू आमच्या घरात का आलास, तू आमच्या घरातून ताबडतोब निघून जा." असे सांगून मज्जाव करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिलाही शिवीगाळ केली. त्यानंतर पिडीत मुलीच्या आईने दुस-या दिवशी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
या प्रकरणाचा तपास महिला सहा. पोलीस निरीक्षक भारती वाठोरे यांनी यांनी करून न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे एकूण ०६ साक्षीदार तपासण्यात आले.
याकामी याकामातील पिडीतेचा, पिडीतेच्या आईचा व पिडीतेच्या मावशीचा जबाब व तपासी अधिकारी यांचा पुरावा या सर्वाचा विचार करून आरोपीला दोषी धरून न्यायालयाने शिक्षा सुनावली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.