Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बृहन्मुंबई महापालिकेतील 55 जण बडतर्फ, 53 जणांचे निलंबन

बृहन्मुंबई महापालिकेतील 55 जण बडतर्फ, 53 जणांचे निलंबन



मुंबई : खरा पंचनामा

विविध प्रकरणात आरोप सिध्द झालेल्या बृहन्मुंबई महापालिकेतील  १३४ जणांवर मुंबई महापालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे. यातील भ्रष्टाचाराचा गुन्हा सिध्द झालेल्या ५५ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले. तर ५३ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. भ्रष्टाचाराचा गुन्हा सिध्द झालेले ५५ तर गुन्ह्याची नोंद झालेले ५३ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तर एकूण १३४ जणांवर कारवाई करण्यात आली. 
 
कामकाजात पारदर्शता जपावी, नियमांना बांधील राहूनच कार्यवाही करावी, भ्रष्टाचाराच्या प्रवृत्तीविरोधात ठामपणे भूमिका घ्यावी, असा दंडक महापालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारताच घालून दिला आहे. त्याचे उचित पालन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
 
मुंबई महापालिका भ्रष्टाचारविरोधी मोहिमेच्या माध्यमातून भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर कारवाई करत असते. १९८८ च्या भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला आवश्यक ते सहकार्य महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येते. भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यानुसार, न्यायालयाच्या स्तरावर आरोपपत्र दाखल करण्याचे अधिकार हे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे ते नाहीत. खटला दाखल करण्याची फक्त ‘अभियोग पूर्व मंजुरी’ ही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्तरावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम १९ (१) अंतर्गत दिली जाते. तसेच लाचलुचपत खात्याकडून केल्या जाणाऱ्या सर्व कार्यवाहीमध्ये आवश्यक ते सर्व सहकार्य बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येते असे एका अधिकाऱ्यांनी सांगितले. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल असलेल्या १४२ प्रकरणात २०० कर्मचारी समाविष्ट आहेत.
या १४२ पैकी १०५ प्रकरणांमध्ये खटला दाखल करण्याची ‘अभियोग पूर्व मंजुरी’ महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे. तर उर्वरित म्हणजे ३७ पैकी ३० प्रकरणे अद्याप लाचलुचपत खात्याच्याच स्तरावर तपासाधीन आहेत.

त्यामुळे त्यांनी महानगरपालिका प्रशासनाकडे अद्याप मंजुरीच मागितलेली नाही. ही प्रकरणे मंजुरीसाठी आल्यास त्याविषयी योग्य ती कार्यवाही महानगरपालिका प्रशासनाकडून निश्चितच व तात्काळ केली जाईल. उर्वरित ७ प्रकरणांपैकी ४ प्रकरणांमध्ये मंजुरी बाबतचा निर्णय लाचलुचपत प्रतिबंधक विभागास कळविण्यात आला आहे. अन्य ३ प्रकरणांमध्ये मंजुरीची कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मिळाली आहे.
 
दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्याच्या कलम १७ (अ) अंतर्गत ३९५ तक्रारी प्राप्‍त झाल्‍या.
या तक्रारी प्रामुख्‍याने कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कर्तव्ये पार पाडण्यासंबधी भ्रष्टाचार अथवा कामात झालेला कथित भ्रष्टाचार इत्यादींबाबत आहेत. रस्‍त्‍यावरील खड्डे, कचरा उचलण्‍यात होणारी कुचराई, दुर्लक्षित कचरा, पदपथांची दुर्दशा, पाणीटंचाई, कीटकनाशक फवारणीमधील कुचराई, सार्वजनिक आरोग्‍य कामांमधील गैरव्‍यवस्‍था अशा स्वरुपाच्या या तक्रारी आहेत.
त्यामुळे ही प्रकरणे ‘अभियोग पूर्व मंजूरी’ प्रकारातील नसतात.
महानगरपालिकेतील विविध कार्यालयांनी आवश्‍यक ती कार्यवाही करावी, यासाठी या लेखी तक्रारी पुढे पाढवलेल्या असतात. अशी माहिती मिळाली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.