मुचंडीत शेतातील 7 किलो गांजाची झाडे जप्त
जत : खरा पंचनामा
जत तालुक्यातील मुचंडीत शेतात लागवड केलेली 7 किलो वजनाची गांजाची झाडे जप्त करण्यात आली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि जत पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.
पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अतिरिक्त अधीक्षक आंचल दलाल यांनी नाशिल्या पदार्थ विक्री, निर्मितीवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे निरीक्षक शिंदे यांनी एक पथक तयार केले होते. जत पोलिसांच्या सहाय्याने मुचंडीत कारवाई करण्यात आली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली कडील आमसिध्दा खोत, अच्युत सुर्यवंशी यांना माहिती मिळाली की, मुचंडी येथील पायनाळ वस्ती येथे शेत मालक मुदकाप्पा उर्फ सिध्दगोडा काडापुरे याचे शेतामध्ये कसत असले श्रीकांत धानाप्पा स्वामी याने मक्याच्या शेतामध्ये गांजाची झाडाची लागवड केली आहे. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील व जत पोलीस ठाणे कडील सयुंक्त पथकाने मुचंडी येथे मक्याच्या शेतामध्ये पंचासमक्ष छापा मारला.
त्या शेतामध्ये एकजण काम करीत असताना दिसला. त्याला पोलीस उपनिरीक्षक महेश गायकवाड व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील अमलदार यांनी ताब्यात घेऊन मक्याच्या शेतामध्ये जाऊन फिरून मक्याच्या शेताची पाहणी केली. त्यावेळी मक्याच्या शेतामध्ये हिरवट उप्र वास असलेली गांजाची लागवड केलेली झाडे मिळाली. त्याबाबत श्रीकांत स्वामी याला झाडाबाबत विचारले. त्यावर त्याने सागितले, मी स्वताच्या फायदयाकरीता मक्याच्या शेतामध्ये लागवड करून जोपासना केली आहे.
लागवड केलेली झाडे ८८ नग झाडे उपडुन त्याचे वजन केले असता त्याचे वजन ७ किलो ६८२ ग्रॅम वजनाचे ३८४१० रुपये किमतीचा ओलसर उग्र गांजा सविस्तर पंचनाम्याने जप्त करण्यात आला असुन त्यांच्यावर जत पोलीस ठाणे येथे गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.