Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आयपीएस देवेन भारती यांच्यासह राज्यातील 74 जणांना राष्ट्रपती पोलिस पदक

आयपीएस देवेन भारती यांच्यासह राज्यातील 74 जणांना राष्ट्रपती पोलिस पदक



नवी दिल्ली : खरा पंचनामा

राष्ट्रपती पोलीस पदकांची आज (25 जानेवारी) घोषणा करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील एकूण 74 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह चार पोलिसांना 'राष्ट्रपती पोलीस पदक' मिळालं आहे. याशिवाय 31 जणांना पोलीस शौर्यपदक तर 39 जणांना 'पोलीस पदक' जाहीर झाली आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी म्हणजे आज हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.

महाराष्ट्रातील चार अधिकाऱ्यांना विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पदकाने गौरवण्यात येणार आहे. राष्ट्रपती पोलीस पदक मिळवलेल्या चार पोलीस अधिकाऱ्यांमध्ये मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अनुप कुमार सिंह, मुंबईतील पोलीस उपनिरीक्षक (वरिष्ठ गुप्तचर अधिकारी, राज्य गुप्तचर विभाग, मुंबई) संभाजी देशमुख आणि ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव यांचा समावेश आहे. तर 31 अधिकारी-कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.

देशातील विविध राज्यांतील एकूण 901 पोलिसांना पोलीस पदकं जाहीर करण्यात आली आहेत. 140 जणांना शौर्य पोलीस पदक, 93 जणांना राष्ट्रपती पोलीस पदक आणि 668 जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक जाहीर झाले आहे. 40 शौर्य पुरस्कारांपैकी सर्वाधिक पुरस्कार अतिरेकी प्रभावित भागात कार्य करणाऱ्या 80 कर्मचार्यांना दिले जाणार आहेत. तर, जम्मू आणि काश्मीर प्रदेशात कार्यरत 45 जवानांना सन्मानित केलं जाणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.