भिलवडीजवळ 8 किलो गांजा जप्त; दोघांना अटक
सांगली : खरा पंचनामा
जिल्ह्यातील भिलवडीजवळ आमनापूर रस्त्यावरील एका हॉलजवळ थांबलेल्या दोघांना अटक करून 8 किलो गांजा, एक दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रविवारी सायंकाळी ही कारवाई केल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.
अजिंक्य विजय जाधव (वय 30), संदीप पिलाजी यादव (वय 27, दोघेही रा. आळसंद, ता. खानापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अतिरिक्त अधीक्षक आंचल दलाल यांनी अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी एक पथक तयार केले.
रविवारी भिलवडी आमनापूर रस्त्यावरील एका हॉलजवळ दोघेजण विना नंबर प्लेटची दुचाकी घेऊन दोघेजण गांजा विक्री करण्यासाठी आल्याची माहिती निरीक्षक शिंदे यांना खबऱयाद्वारे मिळाली. त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने तेथे जाऊन दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतल्यावर त्यांच्याकडे 8 किलो गांजा सापडला.
दोघाही संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात भिलवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.