Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नवीन वर्षात शिंदे सरकार कोसळणार : विरोधकांची भविष्यवाणी

नवीन वर्षात शिंदे सरकार कोसळणार : विरोधकांची भविष्यवाणी



मुंबई : खरा पंचनामा

राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नवं सरकार आलं. तेव्हापासून राज्यातील सरकार पडणार असल्याची विधाने विरोधी पक्षातील नेत्यांकडून केली जात आहेत. आजपासून नव्या वर्षाची सुरुवात झाली असून आजही राज्यातील दोन बड्या नेत्यांनी शिंदे सरकार कोसळणार असल्याचं म्हटलं आहे. एकाने राज्यातील बेकायदा सरकार लवकरच पडणार असल्याचं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सरकार पडण्याची डेडलाईन दिली आहे.

राष्ट्रवादीचे नेते, आमदार अमोल मिटकरी यांनी तर सरकार पडण्याची डेडलाईनच देऊन टाकली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच राज्यात सत्तांतर होणार असल्याची भविष्यवाणी अमोल मिटकरी यांनी केली आहे. त्यामुळे खरोखरच राज्यातील शिंदे-फडणवीस यांचं सरकार पडणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

यावेळी अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या विधानावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षकच होते. ज्यांना कुणाला त्यावर आक्षेप असेल त्यांनी खुली चर्चा करावी, जो हारेल त्याने राजीनामा द्यावा, असं खुलं आव्हानच मिटकरी यांनी दिलं.

दरम्यान, दैनिक 'सामाना'तील 'रोखठोक' सदरामधूनही शिवसेना नेते संजय राऊत यांनी सरकार कोसळण्याचं भाकीत केलं आहे. 16 आमदारांना अपात्र ठरविण्याबाबतचा खटला आता सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. सर्व काही कायद्यानेच झाले तर आमदारांसह मुख्यमंत्री शिंदे अपात्र ठरतील.

तसेच नव्या वर्षात राज्यातील बेकायदा सरकार घरी गेलेले दिसेल. नव्या वर्षात राज्यात व देशात प्रेरणादायी घडावे अशा अपेक्षेत लोक आहेत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.