ठाण्यातील काही नेतेही धर्मवीर : शरद पवार
मुंबई : खरा पंचनामा
मला एक काळजी आहे की, मी जेव्हा ठाण्याला जातो तेव्हा धर्मवीर म्हणून काही नेत्यांची नावे समोर येतात. राज्याचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांचे एकेकाळचे सहकारी होते, त्यांनाही धर्मवीर म्हटले जातं. ठाण्यामध्ये सरकारच्या जाहीरातीमध्ये देखील त्यांचा धर्मवीर असा उल्लेख केला जातो, माझा विरोध नाही. छत्रपती संभाजी महाराज यांना कोणी स्वराज्यरक्षक म्हणो किंवा आणि काही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणावं की स्वराज्य रक्षक हा मुद्द्यावरून सध्या राजकीय वाद सुरू आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यानी आज या वादावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. या वादावर बोलताना शरद पवार म्हणाले की, छत्रपती संभाजीराजे यांच्या कार्याची कोणाला स्वराज्य रक्षक म्हणून आठवण होत असेल तर त्यांच्या तसा उल्लेख करायला हरकत नाही. तसेच त्यांना धर्मवीर बोललं तरी माझी काही तक्रार नाही असे शरद पवार म्हणाले आहेत.
धर्मवीर असो की स्वराज्य रक्षक ज्या व्यक्तीला जशी आस्था असेल आणि आस्थेच्या पाठिमागे जो विचार आहे त्या विचारातून ती आस्था असेल तर वाद करण्याचं काही कारण नाही असेही शरद पवार म्हणाले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.