Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राष्ट्रवादीच्या त्या खासदाराला सुप्रीम दिलासा

राष्ट्रवादीच्या त्या खासदाराला सुप्रीम दिलासा 



नवी दिल्ली : खरा पंचनामा 

लक्षद्वीपचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार मोहम्मद फैजल यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. खासदार मोहम्मद फैजल यांना नुकतेच केंद्रशासित प्रदेशातील एका न्यायालयाने खुनाचा प्रयत्न करण्याच्या प्रकरणात दोषी ठरवले होते. त्यामुळे मोहम्मद फैजल यांचं लोकसभेचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं होतं. 

खुनाच्या प्रयत्नात दोषी असलेले लक्षद्वीपचे माजी खासदार मोहम्मद फैसल यांच्या पोटनिवडणुकीच्या अधिसूचनेला आव्हान दिल्याच्या प्रकरणात माजी खासदार मोहम्मद फैजल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. न्यायमूर्ती कुरियन जोसेफ यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने याचिका निकाली काढताना सांगितले की, निवडणूक आयोगाने असे म्हटले आहे की, केरळ उच्च न्यायालयाने माजी खासदाराच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर आता निवडणूक आयोग सध्याच्या नियमांनुसार पुढील कारवाई करेल. 

13 जानेवारी रोजी, लोकसभेच्या सरचिटणीसांनी एक अधिसूचना जारी करून त्यांना अपात्र घोषित केले होते, कनिष्ठ न्यायालयाने खासदाराला गुन्हेगारी प्रकरणात दोषी ठरवल्याच्या निर्णयानंतर 18 जानेवारी रोजी, निवडणूक आयोगाने एक प्रेस नोट जारी करून 27 फेब्रुवारी रोजी पोटनिवडणुकीची घोषणा केली. ज्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या प्रकरणात राष्ट्रवादीशी संबंधित असलेल्या फैजल यांना 2017 मध्ये खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात दोषी ठरवून 11 जानेवारी रोजी लक्षद्वीप सत्र न्यायालयाने 10 वर्षांची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरोधात त्यांनी केरळ उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून केरळ उच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. 

2009 साली घडलेल्या प्रकरणात खासदार फैजल यांच्यासह तीन जणांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच चारही संशयितांना कोर्टाने एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. मोहम्मद फैजल हे शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.