निगडीत सशस्त्र दरोडा: वृद्धा गंभीर जखमी
सांगली : खरा पंचनामा
शिराळा तालुक्यातील निगडी येथील वस्तीवरील एका घरात दरोडा टाकून वृद्ध महिलेस दाम्पत्याला मारहाण करण्यात आली. यामध्ये वृद्धा गंभीर जखमी झाली आहे. बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. दरोडेखोरांनी तीन तोळ्यांचे सोन्याचे दागिने, दहा हजाराची रोकड, एक मोबाईल लंपास केला. याबाबत शिराळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामध्ये हिराबाई सदाशिव साळुंखे (वय 70), सदाशिव दादू साळुंखे (वय 75) जखमी झाले आहेत. यातील हिराबाई यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत रविंद्र बापू गलुगडे याने फिर्याद दिली आहे. साळुंखे दाम्पत्य निगडी येथे वस्तीवर राहण्यास आहे.
बुधवारी पहाटे दोन अज्ञातांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. साळुंखे दाम्पत्याला मारहाण करत हिराबाई यांच्या अंगावरील दागिने हिसकावून घेतले. नंतर दरोडेखोरांनी दोघांना बेदम मारहाण केली. यामध्ये हिराबाई गंभीर जखमी झाल्या आहेत.
त्यानंतर चोरट्यानी तेथून जवळ असलेल्या एका ऊसतोड मजुराच्या झोपडीतून एक मोबाईलही लंपास केला.
दरोड्याची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सतीश शिंदे, शिराळा येथील निरीक्षक एस. जी. चिल्लवार यांनी फॉजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. निरीक्षक चिल्लवार तपास करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.