संजय राऊत यांच्या अडचणी वाढणार?
मुंबई : खरा पंचनामा
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांच्याविरोधात ईडीकडून तपास सुरु आहे. ईडीने संजय राऊत यांचा जामीन रद्द करावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
ईडीकडून गेल्या अनेक दिवसांपासून या मागणीसाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. पण मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली नाही. त्यामुळे संजय राऊत यांना दिलासा मिळाल्याचं मानलं जात होतं. पण आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संजय राऊत यांचा जामीन रद्द करण्याची मागणी करणाऱ्या ईडीच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे तब्बल 100 दिवस जेलमध्ये राहून आलेले संजय राऊत यांच्या अडचणी वाढू शकतात, अशी चर्चा सुरु झाली आहे.
मुंबई उच्च न्यायालयात 18 जानेवारीला सुनावणी होणार आहे. गोरेगाव पत्राचाळ प्रकरणी ईडी आता हायकोर्टात गेली आहे. विशेष म्हणजे ईडीने यापूर्वीसुद्धा जामीन रद्द करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. याच आरोपांप्रकरणी ईडीने संजय राऊत यांना अटक केली होती.
याप्रकरणी राऊत तब्बल 100 दिवस जेलमध्ये होते. अखेर 9 नोव्हेंबरला विशेष पीएमएलए कोर्टाने त्यांचा जामीन मंजूर केला होता. त्याआधी त्यांचा जामीन अनेकदा रद्द करण्यात आला होता.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी संजय राऊत यांच्याविषयी आणखी एक बातमी समोर आली होती. संजय राऊत यांच्या विरोधात शिवडी कोर्टाने अजामीनपत्र वॉरंट जारी केलंय.
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा ठोकलेला आहे. शिवडी दंडाधिकाऱ्यांच्या कोर्टासमोर यासंदर्भातला खटला सुरु आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.