Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सर्वोच्च न्यायालयाचे सर्व निकाल सर्व भारतीय भाषेत मिळावेत : न्या. चंद्रचूड

सर्वोच्च न्यायालयाचे सर्व निकाल सर्व भारतीय भाषेत मिळावेत : न्या. चंद्रचूड 



मुंबई : वृत्तसंस्था/खरा पंचनामा 

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वोच्च न्यायालयाचे सर्व निकाल सर्व भारतीय भाषांत उपलब्ध होतील या दिशेने काम करण्याचे आवाहन सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी केले. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना न्या. चंद्रचूड यांनी न्यायव्यवस्थेशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांना स्पर्श केला. 

ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाचे निकाल भारतीय भाषांत उपलब्ध व्हायला हवेत. जेणेकरून ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील. अन्यथा ९९ टक्के लोकांपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचे काम पोहचणार नाही. न्यायालयातील सुनावणी प्रत्येकाला समजली पाहिजे, ही जबाबदारी बार कौन्सिलची आहे. न्यायालय आणि वकील काय काम करतात ते ९९ टक्के लोकांपर्यंत पोहोचतच नाही. यानंतरचा आपला पुढचा टप्पा सर्वोच्च न्यायालयाची सर्व निकालपत्रे सगळ्या भारतीय भाषांत उपलब्ध करून देण्याचा असायला हवा. तंत्रज्ञानाच्या मदतीने हे साध्य करता येईल, असेही न्या. चंद्रचूड म्हणाले. 

निकालपत्रे भारतीय भाषांत उपलब्ध करून देण्याच्या न्या. चंद्रचूड यांच्या सूचनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका ट्विटमधून स्वागत केले आहे. पंतप्रधान म्हणाले की, सरन्यायाधीशांची सूचना कौतुकास्पदच आहे. भारतीय भाषांत निकालपत्रे उपलब्ध झाल्यास त्याचा अनेकांना, खास करून ग्रामीण भागातील तरुणांना निश्चीत फायदा होईल.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.