अबू आझमी यांना जीवे मारण्याची धमकी
मुंबई : खरा पंचनामा
समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबु आझमी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आझमींच्या स्वीय सहायकाला हा धमकीचा फोन आला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांत फिर्याद देण्यात आली आहे.
अबु आझमी हे समाजवादी पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आहेत. औरंगजेबाला पाठिंबा दिल्याबद्दल आझमींना शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देणारा फोन त्यांच्या स्वीय सहायकाला आला होता.
आझमींच्या पीएला फोन करून अज्ञात व्यक्तीने शिवीगाळ केली. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर या प्रकरणात मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर कुलाबा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
अबू आझमींना याआधीही जीवे मारण्याची धमकी आली होती. जुलै २०२२ मध्ये आझमींच्या स्वीय सहायकानेच पोलिसांत तक्रार नोंदवली होती. आझमींच्या पक्षाने औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराच्या निर्णयाला विरोध केला होता, त्यामुळे त्यांना फोनवरून धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद केले होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.