Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'काका' कानाला बोटे लावा : जयंत पाटील

'काका' कानाला बोटे लावा : जयंत पाटील



सांगली : खरा पंचनामा

‘आमदार अरुण लाड यांना विधानपरिषद निवडणुकीवेळी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सर्वांनी मदत केली. आमदार विश्वजित कदम यांनी देखील त्यांना मदत केली. राष्ट्रवादीचे युवा नेते शरद लाड यांचे कौतुक करत  काँग्रेस-राष्ट्रवादीचे सर्व नेते आता एकत्र येऊन काम करत आहे आणि पुढेही करूया, असं जयंत पाटील म्हणाले. यावेळी खासदार संजय पाटील यांना उद्देशून जयंत पाटील म्हणाले की, काका कानाला बोटे लावा.’

जिल्ह्यातील कुंडल येथे स्वातंत्र्यसेनानी जी.डी. बापू लाड यांच्या जन्मशताब्दी निमित्त उभारण्यात आलेल्या क्रांती अग्रणी स्फूर्तीस्थळाचे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी आयोजीत कार्यक्रमात जयंत पाटील यांनी जोरदार फटकेबाजी केली.

जयंत पाटील  म्हणाले की, ‘राज्यात इंजिनिअरिंगचे सर्वात जास्त विद्यार्थी
असताना फॉक्सकॉन सारखा प्रकल्प राज्याबाहेर गेला. वेगवेगळ्या प्रथा, लव जिहाद मोर्चा निघत आहेत.
धर्मा-धर्मात विष कालवण्याचे काम जे करत आहेत त्यांना आज लाड, नायकवडी याचा विचार सांगा.
जी.डी. बापूंनी क्रांती लढ्यात जिल्ह्यातील लोकांचा आवाज उठवला. कुंडल हे स्वातंत्र्यसंग्रामचे केंद्र होते. कृष्णेच्या पाण्याचा धाक ब्रिटिशांना देखील येथील स्वातंत्र्यसैनिकांनी दाखवला.’ असेही जयंत पाटील म्हणाले.

जयंत पाटील म्हणाले की, ‘आपण एकसंध राहण्याची गरज आहे. एकसंध राहून महाराष्ट्रचे चित्र बदलण्याचे काम करायचं आहे. जी. डी. बापूंचे जन्मशताब्दी निमित्ताने ज्या घटकांना न्याय द्यायचा होता, त्या घटकांना पुढे घेऊन जाण्यासाठी शपथ घ्यायची आहे. आज राज्यात लव्ह जिहाद अशा गोष्टींचा प्रचार सुरू झाले आहेत. निवडणूका जवळ आल्या, की अशा गोष्टी सुरू होतात, असेही पाटील म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.