Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

जाहिरात प्रसिद्ध करूनच महापालिकेत नोकरभरती : उपायुक्त रोकडे

जाहिरात प्रसिद्ध करूनच महापालिकेत नोकरभरती : उपायुक्त रोकडे 



सांगली : खरा पंचनामा

महानगरपालिकेमध्ये नोकरभरती शासनाच्या नियमानुसार केली जाणार असून नोकरी लावण्याच्या आमिषाला कोणीही बळी पडू नये तसेच सध्या कोणत्याही प्रकारची मानधन कंत्राटी भरती सुरू नाही असा खुलासा मनपा उपायुक्त राहुल रोकडे यांनी केला आहे.

रोकडे म्हणाले की, सध्या महानगरपालिकेत नोकर भरती प्रक्रिया सुरु नाही.  सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचा सध्या आकृतिबंध मंजूर करण्याची अंतिम टप्प्यात आहे. त्याच्या महानगरपालिककेच्या सेवा शर्ती अधिनियम अंतिम करण्यात येतील. यानंतर शासनाच्या निर्देशानुसार बिंदू नामावली तपासून घेण्यात येईल. वरील तीन्ही टप्प्यातील प्रक्रिया पार पाडल्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार महानगरपालिकेत कायम कर्मचारी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया राबवत असताना विहीत पध्दतीने वर्तमानपत्रामध्ये जाहीरात देवून, अर्जदार यांचे अर्ज मागवून आवश्यकतेनुसार लेखी/तोंडी परिक्षा घेवून गुणवत्तेच्या आधारे पारदर्शक भरती केली जाणार आहे. 

केवळ गुणवत्ता हाच निकष भरती प्रक्रियेवेळी तपासला जाणार आहे. तसेच, सध्या मानधनी / कंत्राटी भरती प्रक्रिया ही महानगरपालिकेमार्फत सुरु नाही. ही भरती करताना देखील रितसर वर्तमानपत्रामध्ये जाहीरात देवूनच केली जाते. तरी महानगरपालिकेमध्ये नोकरी लावण्याच्या उद्देशाने कोणीही कोणाच्याही आमिषाला बळी पडून स्वतःची फसवणूक करुन घेवू नये, असे आवाहन महापालिकेचे उपायुक्त राहुल रोकडे यांनी केले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.