Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

भाजप कार्यकर्त्याची पत्नीसह आत्महत्या!

भाजप कार्यकर्त्याची पत्नीसह आत्महत्या!



नाशिक : खरा पंचनामा

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात राहण्याऱ्या भाजप कार्यकर्त्याने आपल्या पत्नीसह आत्महत्या केली. मंगळवारी रात्री ही घटना उघडकीस आली आहे.

पंकज बिरारी (वय ४०) व रेणुका बिरारी (वय ३५) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. पंकज आणि रेणुका यांनी आत्महत्या केली तेव्हा घरात कोणीच नव्हतं, म्हणून हा प्रकार उशिरा लक्षात आला. पंकज भाजपचा धडाडीचा कार्यकर्ता होता. पण कर्जबाजारीपणा आणि खासगी कंपनीने लावलेल्या तगादा याला त्रासून दोघांनी आत्महत्या केली असावी, अशी परिसरात चर्चा आहे. 

तरीही दोघांच्या आत्महत्येचे खरे कारण अद्याप समजू शकले नाही. पंकज ने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवल्याचीही चर्चा आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक प्रदीपकुमार जाधव, कॅम्प पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश काळे घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेत मालेगावच्या सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. पोलिसांनी पंचनामा करत घटनेचा तपास सुरू केला आहे. उद्या या प्रकरणी गुन्हा दाखल होईल असे पोलिसांनी सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.