ड्युटीवरून येताच महिला पोलिसाची आत्महत्या
अहमदनगर : खरा पंचनामा
अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षात कार्यरत असणाऱ्या महिला पोलीसाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. महिला पोलिसाच्या आत्महत्येनंतर जिल्हा पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
अर्चना रावसाहेब कासार असे आत्महत्या केलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. रविवारी सकाळी ड्युटीवरून घरी परतल्यानंतर त्यांनी खोलीचा दरवाजा बंद करुन घेतला. काही वेळाने त्यांनी आत्महत्या केल्याचे आढळून आले.
अर्चना कासार यांनी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे अद्याप समजू शकले नाही. मात्र कौटुंबिक वादातून त्यांनी हे पाऊल उचलले असावे, अशी चर्चा पोलीस दलात आहे. पोलिसांत असलेल्या पतीचे निधन झाल्यानंतर अनुकंपा तत्वावर त्या पोलीस सेवेत काही वर्षांपूर्वी दाखल झाल्या होत्या.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.