Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत धीरज सूर्यवंशी-अतुल माने यांच्यात महापालिकेसमोरच फ्री स्टाईल हाणामारी!

सांगलीत धीरज सूर्यवंशी-अतुल माने यांच्यात महापालिकेसमोरच फ्री स्टाईल हाणामारी!



सांगली : खरा पंचनामा 

सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेतील भाजपचे माजी उपमहापौर, विद्यमान स्थायी समितीचे सभापती धीरज सूर्यवंशी आणि भाजपच्याच युवा मोर्चाचे सरचिटणीस अतुल माने यांच्यात शुक्रवारी महापालिकेच्या दारातच फ्री स्टाईल हाणामारी झाली. त्यानंतर दोघांच्याही समर्थकांनी महापालिका परिसरात गर्दी केली होती. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. समोरच असलेल्या शहर पोलिस ठाण्यातून तातडीने पोलिसांनी धाव घेतल्याने वातावरण निवळले. चैत्रबन नाल्याची निविदेवरून हा वाद झाल्याची चर्चा शहरात सुरु आहे.

आज महापालिकेत स्थायी समितीची सभा होती. या सभेसाठी सूर्यवंशी व अन्य सदस्य पालिकेत आले होते. सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली सभा सुरु झाली. दरम्यानच्या काळात माने महापालिकेच्या मंगलधाम कार्यालयात आले होते. ते महापालिकेतील विविध विकासकामाचे ठेके त्यांच्या समर्थकांकरवी घेत असतात. माने ज्या प्रभागात काम करतात त्यात म्हणजे पोलिस मुख्यालयाच्या दक्षिण बाजूला वाहणाऱ्या चैत्रबन नाल्याच्या बांध बंदिस्तीसाठी दहा कोटींच्या विकास कामाची निविदा प्रसिध्द करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समितीमधून हे काम करण्यावरून तसेच हा निधी पालिकेऐवजी जिल्हा नियोजन समितीकडे वर्ग करण्यावरूनही यापुर्वी वाद रंगला होता. 

आज माने या कामासाठी महापालिकेत आल्याची माहिती सूर्यवंशी यांना मिळाली. त्यानंतर दोघांमध्ये फोनवरून बाचाबाची झाली. त्यांनंतर माने यांनी महापालिकेचे मुख्यालय गाठले. सभा सुरु असतानाच मधेच सूर्यवंशी बाहेर आले. दोघे समोरासमोर आल्यानंतर त्यांच्यात थेट जुंपली. काही नगरसेवक वाद सोडवण्यासाठी धावले. पोलिस आले. पोलिसांनी तत्काळ माने यांना बाजूला घेत शहर पोलिस ठाणे गाठले. त्यामळे वातावरण तंग झाले. 

वादावादीची माहिती दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना समजताच ते पालिकेसमोर आले. त्यानंतर सायंकाळपर्यंत वातावरण तणावपूर्ण होते.

भाजपच्या वरीष्ठ नेत्यांनी दोघांचीही फोनवरून समजून काढली. तथापि रात्री उशिरापर्यंत वाद धुमसत होता. दरम्यान ठेकेदार माने यांना काही काँग्रेसच्या नगरसेवकांनी सपोर्ट केल्याचीही चर्चा होती. त्यामुळे आता त्या टेंडरमध्ये काय होते याची उत्सुकता नगरसेवक, ठेकेदार आणि दोघांच्या समर्थकांना लागली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.