तासगावमध्ये पत्रकारासह तीन दुचाकी चोरट्यांना अटक; पाच गाड्या जप्त
तासगाव : खरा पंचनामा
तासगाव शहरासह परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या तिघांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे. यामध्ये एका पत्रकाराचाही समावेश आहे. तासगाव पोलिसांनी ही कारवाई केली. त्यांच्याकडून चोरी केलेल्या अडीच लाख रुपये किमतीच्या 5 दुचाकीही जप्त करण्यात आल्या आहेत.
सुजित रमेश खोत (वय २३, रा. हनुमानमळा, राजापुर, ता. तासगाव, जि. सांगली.), प्रविण अनिल कांबळे वय (२०) साहील सोमनाथ कांबळे (वय १८, दोघे रा. तासगाव रोड, विसापुर, ता. तासगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दिनांक ०४ डिसेंबर रोजी सायंकाळी तासगांव एस टी स्टॅण्ड जवळ लावलेली मोटरसायकल (MH 09 EH 0397) अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याबाबत तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणेत आला आहे.
सांगली जिल्हयातील मोटर सायकल चोरीच्या गुहयांबाबत पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी आढावा बैठकिमध्ये दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकिस आणणेबाबत आदेश दिला होता. त्यानुसार पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांनी तासागव पोलीस ठाणेकडील गुन्हेप्रगटिकरण पथकास कारवाई करण्याच्या सुचना दिल्या.
दिनांक ०३ जानेवारी रोजी तासगाव डीबी पथकाकडील अमित परीट, अमोल चव्हाण, सोमनाथ गुंडे, समीर आवळे, सतिश खोत मोटरसायकल चोरीच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना खास बातमी दारामार्फत बातमी मिळाली कि, केंद्री चौक येथे सुजित खोत हा पत्रकार एक चेरी रंगाची बुलेट गाडी घेवुन थांबलेला असुन ती मोटरसायकल चोरीची आहे अशी माहिती पथकाला मिळाली.
पथकाने बेंद्री चौक येथे जावून खात्री केली असता सुजित खोत बुलेट मोटर (MH 10 CG 6060) घेवुन थांबलेला दिसला. त्याचेकडे गाडीच्या कागदपत्राबाबत चौकशी केल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पथकाने त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडे तपास केला असता त्याने ती बुलेट सुमारे १० महिन्यापुर्वी पलुस येथुन चोरुन आणल्याची कबुली दिली. त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने साथीदारांसह मिळुन दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
त्यांच्याकडून एकुण ५ मोटर सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक भानुदास निंभोरे, अमित परीट, अमोल चव्हाण, सोमनाथ गुंडे, समीर आवळे, सतिश खोत यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.