Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सुधीर तांबे काँग्रेसमधून निलंबित, सत्यजित मात्र वेटिंगवर!

सुधीर तांबे काँग्रेसमधून निलंबित, सत्यजित मात्र वेटिंगवर!



नवी दिल्ली : खरा पंचनामा

नाशिक पदवीधर निवडणुकीच्या उमेदवारीवरून तांबे पितापुत्रामुळे काँग्रेसवर मोठी नामुष्की ओढावली. या जागेवर काँग्रेसने सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली. फॉर्म भरण्यासाठीचा एबी फॉर्मही काँग्रेसने सुधीर तांबेंना पाठवला, पण त्यांनी उमेदवारी अर्जच दाखल केलाच नाही. आज काँग्रेसने सुधीर तांबे यांचे पक्षातून निलंबन केले. मात्र सत्यजित तांबे यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

सुधीर तांबे यांच्याऐवजी त्यांचे पूत्र सत्यजीत तांबे यांनीच उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म नसल्यामुळे सत्यजीत तांबे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. उमेदवारी आणि एबी फॉर्म देऊनही अर्ज दाखल न करणाऱ्या सुधीर तांबे यांच्यावर काँग्रेस पक्षाने निलंबनाची कारवाई केली आहे. चौकशी होईपर्यंत सुधीर तांबे यांचं निलंबन करण्यात आलं आहे. तसे ट्विट पक्षातर्फे करण्यात आले आहे.

दरम्यान सत्यजीत तांबे यांच्याबाबत अजूनतरी पक्षाने कोणताही निर्णय घेतला नाही, पण नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देणार नाही, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आपण काँग्रेसमध्येच आहोत, असं सत्यजीत तांबे म्हणाले होते. सोबतच या निवडणुकीसाठी आपण महाविकास आघाडीसह भाजपचाही पाठिंबा मागणार आहोत, असं विधान सत्यजीत तांबे यांनी केलं होतं.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.