बनावट हॉलमार्क लावलेले दीड कोटींचे सोन्याचे दागिने जप्त
मुंबई : खरा पंचनामा
मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर या मुख्य शहरांसह महाराष्ट्रातील 6 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले. मुंबईतील झवेरी बाजार येथे सोन्याच्या दागिन्यांवर बनावट हॉलमार्किंग करणाऱ्या दोन आस्थापनांवर छापे टाकून कारवाई केली, त्यात सुमारे 1.5 कोटी रुपयांचे 2.75 किलो सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
भारतीय मानक ब्युरोने (BIS, बीआयएस ब्युरो) सोन्याच्या दागिन्यांवरील बीआयएस चिन्हाचा गैरवापर रोखण्यासाठी 20 जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्यातील प्रमुख शहरांमध्ये विशेष अंमलबजावणी मोहीम राबवली. मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर या मुख्य शहरांसह महाराष्ट्रातील 6 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले. यावेळी बीआयएसप्रमाणे सुयोग्य चाचणी आणि गुणवत्ता तपासणी न करता, सोन्याच्या दागिन्यांवर बनावट हॉलमार्क लावून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली.
मेसर्स श्रीशंकेश्वर ॲसेइंग अँड टच, झवेरी बाजार, मुंबई, मे. जय वैष्णव हॉलमार्किंग सेंटर, झवेरी बाजार, मुंबई, मे. विशाल हॉलमार्किंग सेंटर, जांभळी नाका, ठाणे, मेसर्स श्रीशंकेश्वर ॲसेइंग अँड हॉलमार्किंग सेंटर, अंधेरी, मुंबई, मे. जोगेश्वरी ॲसेइंग अँड हॉलमार्किंग सेंटर, रविवार पेठ, पुणे आणि मे. रिद्धी सिद्धी हॉलमार्क, इतवारी, नागपूर या ठिकाणी देखील छापा टाकून जप्तीची कारवाई करण्यात आली.
बीआयएस कायदा 2016 नुसार, बीआयएस मानक चिन्हाचा गैरवापर केल्यास दोन वर्षांपर्यंत कारावास किंवा किमान लाख रुपये दंडाची शिक्षा आहे, परंतु हॉलमार्कसह किंवा बीआयएस कायदा 2016 नुसार स्टँडर्ड मार्कसह चिकटवलेल्या किंवा लागू केलेल्या वस्तूच्या मूल्याच्या दहापट पर्यंत सुध्दा ही रक्कम वाढविता येते. वर नमूद केलेल्यांवर न्यायालयात खटला दाखल करण्याची कारवाई सुरू केली जात आहे. अशा बेकायदेशीर बनावट मार्किंगमध्ये सहभागी असलेल्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.