मुंबई मनपा आयुक्तांना ईडीचे समन्स!
मुंबई : खरा पंचनामा
माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू समजले जाणारे, मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल हे ईडीच्या रडारवर आले आहेत. कथित कोविड केंद्राच्या घोटाळा प्रकरणी चहल यांना ईडीने समन्स पाठवले आहे. कोरोना काळात कोरोना केंद्रामध्ये वैद्यकीय उपकरण खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. याप्रकरणी आयुक्त चहल यांना सोमवारी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे.
हा संपूर्ण घोटाळा 100 कोटींचा असून यामध्ये बेनामी कंपनीला कोविड केंद्राचे कंत्राट दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
कोरोना काळात बीएमसीकडून कोव्हिड सेंटरमध्ये वैद्यकीय सेवा आणि उपकरणे पुरवठा करण्यासाठी बाहेरील कंपनीला कंत्राट दिले. तसेच लाइफ लाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस या कंपनीला वरळी आणि दहिसर येथील जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट दिले होते. मात्र ही कंपनीच बोगस असल्याचा आणि कुठल्याही प्रकारचा वैद्यकीय क्षेत्रात अनुभव नसल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. यामध्ये 100 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मुंबईत कोरोनाचा विस्फोट सुरु होता त्यावेळी मुंबई महापालिकेने मोठी आणि महत्त्वाची कामे केली होती. कोरोना संकट काळात लाखो नागरिकांचा मृत्यू झाला. पण कोट्यावधी नागरिकांना वाचवण्यात मुंबई महापालिकेला यश आले. विशेष म्हणजे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्याने महापालिकेपुढे मोठे आव्हान होतं. पण ते आव्हान महापालिकेने पेललं होतं.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.